Swami Amalanand

 

स्वामी अमलानंद यांचा जीवनपट

८ जानेवारी १९०३
जन्म
२४ मार्च १९०३
बहिणीचा मृत्यू.
३० मार्च १९०३
वडिलांचे निधन.
१ मार्च १९११
मौजीबंधन
१२ जून १९२३
मॅट्रिक परीक्षा ऊत्तीणॅ.
१ ऑगस्ट १९२३
सरकारी नोकरीस प्रारंभ.
९ डिसेंबर १९२५
प्रथम विवाह.
२३ जानेवारी १९२८
प्रथम पत्नीचा मृत्यू.
२८ एप्रिल १९२८
व्दितीय विवाह.
इ. स. १९३२
नोकरीत  प्रिव्हेंटिव्ह ऑफिसर म्हणून बढती.
३१ ऑक्टोबर १९३६
पहिला मुलगा (दत्तात्रेय)
१९ ऑगस्ट १९३९
पहिली कन्या (कृष्णा)
२५ ऑगस्ट १९४१
दुसरा मुलगा (पुरूषोत्तम)
१० ऑगस्ट १९४४
तिसरा मुलगा (मुकुंद)
१६ मार्च १९४७
मातोश्रींचे निधन.
२० एप्रिल १९४७
दुसरी कन्या (रजनी)
२५ सप्टेंबर १९५२
स्वामी स्वरूपानंद (पावस) मंत्रदीक्षा.
२ एप्रिल १९५९
स्वामी स्वरूपानंदाचे पहिले पत्र .
१८ जानेवारी १९६०
स्वामी स्वरूपानंदाचे पावस येथे पहिले प्रत्यक्ष दर्शन.
१८ मार्च १९६०
पावस येथे सदगुरू स्वामी स्वरूपानंद विरचित्त 'अभंग ज्ञानेश्वरी' प्रथमावृत्तीच्या प्रकाशन समारंभास उपस्थिती व सदगुरू पहिला दिर्घ सहवास.
२४ ऑक्टोबर १९६२
डेप्युटी सुपरिटेंन्डन्ट, सेंन्ट्रल एक्साइज, म्हणून निवृत्त.
१८ फेब्रुवारी १९६८
मामांच्य़ा हस्ते पावस येथे देसाई बंधूकडे विघूत दीपाचे उदघाटन. पु. ल. फडके यांस स्वामी स्वरूपानंद यांचा अनूग्रह.
१ एप्रिल १९६८
शिर्डी साकोरी येथे साई महाराञांचे दर्शन. घृष्णेश्वर, पैठण, आंबेजोगाई य़ात्रा. य़ोगेश्वरी दर्शन.
५ डिसेंबर १९६८
स्वामी मूक्तानंदाची वज्रेश्वरी येथे भेट.
१३ एप्रिल १९६९
'दीपलक्ष्मि़चा' स्वामी स्वरूपानंद विशेषांक प्रकाशित.
१८ जुलै १९७०
कोल्हापूर येथे श्री महालक्ष्मी दर्शन. तासंगाव- चिंचणी येथे महादेव नाथ समाधी दर्शन.
१५ ऑगस्ट १९७४
स्वामी स्वरूपानंदाचे निर्वाण.
११ जुलै १९७६
स्वामी म्हणे अमलानंद - संपादक : श्री वसंत भट व अमलगाथा - संपादक : श्री अनिल श्रीखंडे हे ग्रंथ प्रसिध्द् झाले.
१५ डिसेंबर १९७७
योगानंद, नित्यानंद, अमलानंद - संपादकः म. दा. भट, हा ग्रंथ प्रसिध्द् झाला.
७ जानेवारी १९७८
कोल्हापूर येथे अमृतमहोत्सव साजरा. पूणे येथे अमलानंद दर्शन ग्रंथ प्रकाशित.
१२ ते १६ नोव्हेंबर १९७८
निवडक शिष्यवर्गासह बिलमोरिया, आहुआ, गरूडेश्र्वर, बडोदा येथे यात्रा. प. पू. सानेदादा यांजकडुन बिलमोरिया येथे भव्य सत्कार.
६ मे १९८२
नृसिंहवाडी येथे पू. म्हादबा पाटील यांजकडुन परमार्थ कार्याचा गौरव व आशीर्वाद.
२९ मे १९८४
पूणे येथे स्वामी 'अमलानंद चरित्र 'प्रकाशन सिद्धयोगी रामबाबा यांजकडुन पूणे येथे सत्कार.
११ ते १५ मे १९८६
गिरनार यात्रा
१७ एप्रिल १९८८
महानिर्वाण
१६ डिसेंबर १९९४
पेण येथे स्वामी अमलानंद स्मृतिधामाचे प. पू. शंकराचार्य करवीर पीठ, यांच्या हस्ते उदघाटन.

 

 

 

 

 

     
हृदयस्थ स्वामी अमलानंद यांचे चरणी अर्पण