Swami Amalanand

 

 

 

 

मनोगत

 

या सर्व संकलनामागचा एक प्रामाणिक हेतू एवढाच आहे की, जे जुने जाणते गुरूभक्त असतील त्यांच्या या वाचनामुळे पूर्व स्मृति जागृत होऊन पुन: ते गुरूभावावर आरूढ व्हावेत व गुरुप्रेमाच्या अमृत सागरात ते यथेच्छ डुंबून जावेत हिच एकमेव सदिच्छा.

 

त्याचप्रमाणे आजच्या या कलियुगात अद्याप हे गुरूतत्व  कसे कार्यान्वीत आहे याचे ज्ञान या मार्गात नव्यानेच प्रविष्ट होणारे जे मुमुक्षु असतील त्यांना व्हावे व त्यांनी खर्‍या अध्यात्माची कास धरावी, त्या करिता केलेला हा अल्प प्रयत्न.

 

जे जे चांगले आहे ते ते स्वामींचे व ज्या काही त्रुटी राहिल्या असतील त्या आमच्या. त्या बद्दल ज्यांना कोणाला सूचना करावयाच्या असतील त्यांचे येथे स्वागत केले जाईल व त्यांच्या सूचनांचा विचार केला जाईल

 

* * *

 

 

आभार

 

  • आदरणीय प. पू. स्वामी प्रज्ञानंद व प. पू. स्वामी सहजानंद यांच्या कृपाआशीर्वादामुळे व त्यांनी वेळोवेळी दिलेल्या उत्तेजनामुळे हे कार्य शेवटास जाऊ शकले

 

  • प. पू. अमलानंद स्वामीच्या फोटोंचे सर्व जुने ल्बम आम्हांला दिल्यामुळे ही वेबसाइट परिपूर्ण होण्यास मोलाची मदत झाली, त्याबद्दल प. पू. स्वामी सहजानंदाचे विशेष आभार

 

  • ज्या ज्या पुस्तकांचे संदर्भ येथे घेतलेले आहेत त्या त्या लेखक व लेखीकांचे आभार

 

  • आम्हांला वेळोवेळी संदर्भासाठी लागणारी सारी पुस्तके पुरवून केलेल्या व इतर सर्व मदतीबद्दल श्री. श्रीपाद दांडेकर व सौ. गिरीजा दां डेकर यांचे आभार

 

  • प. पू. अमलानंद स्वामींचे छायाचित्रे संगणीकृत करून दिल्या बद्दल श्री. जीतेंद्र टाकेकर यांचे आभार

 

  • ज्यांचे ज्यांचे अनुभव या वेबसाइट साठी घेतलेले आहेत त्या सर्व लेखक व लेखीकांचे आभार

 

* * *

 

 

संकेत स्थळ प्रकाशनाची तारीख

दि. ०१ डिसेंबर २००९ - मार्गशीर्ष १९३१

दत्त जयंती

 

 

     
हृदयस्थ स्वामी अमलानंद यांचे चरणी अर्पण